राष्ट्रवादीला धक्का, आणखी एका नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला!

राष्ट्रवादीला धक्का, आणखी एका नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला!

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून आणखी एका नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला लागला आहे. परभणीतील राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. समीर दुधगावकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान समीर दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आपला भाजप प्रवेश निश्चित केला आहे. गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होता, पण मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळेसही दुधगावकरांना डावलून राजेश विटेकर यांना लोगसभेची उमेदवारी दिली, त्यामुळेच समीर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS