“कर्तृत्व बोलते तुमचे, दिशा दाखवली तुम्ही, चार फितूर जाहले तरी, लाखो सोबती आम्ही !”

“कर्तृत्व बोलते तुमचे, दिशा दाखवली तुम्ही, चार फितूर जाहले तरी, लाखो सोबती आम्ही !”

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर असून शुक्रवारी (२० सप्टेंबर) त्यांच्या उपस्थितीत सूर्या लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल्यानंतर पवार हे औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांची भेट तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना टोला लगावण्यात आला आहे. कर्तृत्व बोलते तुमचे, दिशा दाखवली तुम्ही, चार फितूर जाहले तरी, लाखो सोबती आम्ही, असे पोस्टर पवार यांच्या कार्यक्रमात लावण्यात आले आहेत. त्यामुळे या पोस्टरची राज्यभरात चर्चा सुरु आहे.

दरम्यान जालना येथे आज सकाळी झालेल्या कार्यकर्ता मेळ्याव्यात शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहो. ‘आज शेती व्यवस्था वाईट झालीय. राज्याची आणि देशाची अवस्था ज्यांच्या हाती आहे, त्यांनी शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. ही परिस्थिती सुधारण्याबाबत सरकार काहीही करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढायला लागल्या आहेत. केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारखानदारांचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नसल्याचे सांगितले.’

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. यांना हाकलून द्यायची हीच योग्य वेळ आहे. जर तुम्ही आणि मी एकत्र आलो तर सत्ताधाऱ्यांना हाकलायला वेळ लागणार नाही. असंही पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS