राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड येत्या 29 तारखेला पुण्यात होणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची फेरनिवड होणार की इतर कोणांची वर्णी लागणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे पुन्हा प्रदेशाध्यक्ष घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता जयंत पाटील आणि शशिकातं शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र अनुभव, अभ्यास, बेरजेच राजकारण, काँग्रेसशी असलेले चांगले संबंध  आणि सुप्रिया सुळे यांचा असलेला पाठिंबा यामुळे जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय.

शशिकांत शिंदे हेही स्पर्धेत आहेत. माथाडी कामगाराचे नेते, आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तर अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. दोघांच्यावरही आजपर्यंत घोटाळ्याचे फारसे आरोप नाहीत. त्यामुळे आता येत्या 29 तारखेला शरद पवार कोणाच्या पारड्यात वजन टाकतात की काही वेगळाच निर्णय घेतात हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.

COMMENTS