अभिनेत्री प्रिया बेर्डे राजकारणात, राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

अभिनेत्री प्रिया बेर्डे राजकारणात, राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

पुणे – अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या लवकरच राजकारणात येणार आहेत. 7 जुलै रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील मार्केट यार्ड येथील ‘निसर्ग’ या पक्षाच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच प्रिया बेर्डे यांच्यासोबत ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान सिनेसृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणाऱ्या आणि सिनेसृष्टीचा खरा आधार असणाऱ्या लोकांना मला मदत करायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो. यातून मी कलाकारांच्या अडचणी समजू शकते, त्यांना योग्य मदत करू शकते. त्यामुळे मी माझ्या कार्यकिर्दीचा हा नवीन टप्पा सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पुणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं शहर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं काम पुण्यात सुरू आहे. माझं हॉटेलही पुण्यात असून माझ्या मुलांचं शिक्षणही पुण्यातच झालं आहे. त्यामुळे इथूनच मी माझ्या नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS