राष्ट्रवादीचा शिवसेनेला नवा प्रस्ताव, उद्धव ठाकरे म्हणतात भाजपही संपर्कात!

राष्ट्रवादीचा शिवसेनेला नवा प्रस्ताव, उद्धव ठाकरे म्हणतात भाजपही संपर्कात!

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. परंतु तरीही राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरुच आहेत. आता राष्ट्रवादीनं शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी नवा प्रस्ताव पाठवला असून यामध्ये त्यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची माहिती आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा राज्यात मध्यावधी निवडणुकांचीही नामुष्की येऊ शकते. असं झाल्यास या सर्वच पक्षांचे सत्तास्थापनेचं नियोजन बिघडणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून हालचाल केली जात आहे.

भाजपकडून माझ्याशी संपर्क सुरु –
उद्धव ठाकरे

दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेबाबतचा तिढा वाढत असताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्ष माझ्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. भाजपकडून माझ्याशी संपर्क सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे तीनही पक्ष माझ्या संपर्कात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनुरुच्चारही ठाकरे यांनी केला आहे.

COMMENTS