राष्ट्रवादीची पुण्यात महत्त्वाची बैठक, ‘या’ विषयांवर होणार चर्चा!

राष्ट्रवादीची पुण्यात महत्त्वाची बैठक, ‘या’ विषयांवर होणार चर्चा!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक
आज पुण्यात होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘वन मोदीबाग’ याठिकाणी ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलिप वळसे पाटील, सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. महत्वाचं म्हणजे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळदेखील या बैठकीसाठी येणार असल्याचं कळतय. प्रत्यक्षात ते येतात का याबद्दल उत्सुकता आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूकीची तयारी, आघाडीचे जागावाटप, उमेदवार निश्चिती, मित्रपक्षांना सोबत घेण्याबाबतची भूमिका अशा सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. अलिकडच्या काळात पक्षाला लागलेली गळती हादेखील बैठकीतील चर्चेचा विषय असू शकतो. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटीलांसाठी इंदापूरची जागा सोडायची का यावर देखील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

COMMENTS