रायगड लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं केला दावा !

रायगड लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं केला दावा !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज लोकसभा निवडणूक आढवा बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. त्यावर सुनील तटकरे यांनी तात्काळ मी निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही, भास्कर जाधव यांची इच्छा असेल तर त्यांना संधी द्यावी आम्ही काम करू असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातून भाष्कर जाधव हे निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आजच्या बैठकीत काँग्रेसच्या पुण्याच्या जगेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक तर काँग्रेसचे नऊ महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला 26% मतदान तर काँग्रेसला 14% मतदान झालं. त्यामुळे ही जागा राष्टावादीला मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या जागेबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS