रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, नव्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली ‘ही’ मागणी !

रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, नव्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली ‘ही’ मागणी !

अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी पक्षाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु रोहित पवार यांच्या विधानसभा उमेदवारीचा मार्ग आणखी बिकट झाला आहे. कारण राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कर्जत जामखेडमधून महिलेला उमेदवारी देण्यची मागणी पक्षाकडे केली आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या मागणीनूसार कर्जत जामखेडची जागा महिलेला मिळावी, त्यानूसार वरिष्ठांना कळवलं जाणार असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्जत जामखेडमधून महिला आघाडीच्या मनिषा गुंड उमेदवारीसाठी आग्रही आहेत. अशातच आता या मतदारसंघात महिलेला उमेदवारी देण्याची मागणी चाकणकर यांनी केली आहे. नगर जिल्ह्यात महिलांना अभय हवं आहे. सध्याच्या सरकारमधील नेते महिलांच्या प्रश्नावर जागरुक नाहीत. त्यामुळे महिला संघटन वाढवून या प्रश्नावर लढावे लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवारी महिला नेत्याला देण्यात यावी असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता याबाबत पक्षनेतृत्व काय निर्णय घेतं ते पाहण गरजेचं आहे.

COMMENTS