पिंपरी-चिंचवडमध्ये तीन ही जागा आल्या पाहिजेत, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना !

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन ही जागा आल्या पाहिजेत, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना !

पिंपरी-चिंचवड – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. विधानसभेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवा, नवीन चेहरे द्या असा चिमटा शरद पवार यांनी प्रस्थापितांना दिला आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये तीन ही जागा आल्या पाहिजेत, आतापासूनच कामाला लागा अशा सूचनाही पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दरम्यान यावेळी पवार यांनी धर्माचा अभिमान असावा तो घरात असावा, सार्वजनिक कार्यक्रमात असेल तर ठीक आहे, पण तो राज्यकारभाराचा भाग नसावा, आज काल धर्माच्या नावावर मते मागितली जातात हे चुकीचे असल्याचे म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथमधील ध्यान धारनेवर टीका केली आहे.

तसेच पुन्हा एकदा शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमबाबत आमच्या मनात शंका आहे. सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला ते ठीक आहे. पण कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. ईव्हीएमबाबत अनेक तक्रार आहेत.त्या चिंतेची बाब असून निवडणूक प्रक्रियेवरच विश्वास उडाला तर लोकशाही धोक्यात येईल, लोक आक्रमक होतील असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS