पवारांना धोका देणाय्रा या आमदारांना जनतेनं दिला धक्का!

पवारांना धोका देणाय्रा या आमदारांना जनतेनं दिला धक्का!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणं पाच आमदारांना चांगलच महागात पडलं आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या सात आमदारांपैकी केवळ दोघांना निवडणुकीत यश आलं आहे. तर पाच जणांना पराभव स्वीकारावा लागला आहे. राणा जगजितसिंह पाटील, भास्कर जाधव या दोन आमदारांचा विजय झाला आहे. तर दिलीप सोपल, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा या आमदारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पवारांची साथ सोडण या आमदारांना चांगलच महागात पडलं आहे.

दरम्यान अहमदनगर श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपात गेलेले बबनराव पाचपुते हे पराभवाच्या छायेत आहेत. तर अकोल मतदारसंघातून वैभव पिचड हे पराभूत झाले आहेत. तसेच शिवसेनेत गेलेले पांडुरंग बरोरा शहापूर ठाण्यातून पराभूत झाले आहेत. सोलापूरमधील बार्शी मतदारसंघातून दिलीप सोपल हे पराभूत झाले आहेत. तसेच रश्मी बागल या आमदार नव्हत्या परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या देखील सोलापूर करमाळामधून पराभूत झाल्या आहेत. तसेच शेखर गोरे हे देखील पराभूत झाले आहेत.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानाबद तुळजापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेले आमदार भास्कर जाधव हे गुहागरमधून विजयी झाले आहेत. बीडमधून जयदत्त क्षीरसागर हे विजयाच्या वाटेवर आहेत.

COMMENTS