शरद पवार सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौय्रावर, शेतकरी, दुष्काळी जनतेशी साधणार संवाद !

शरद पवार सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौय्रावर, शेतकरी, दुष्काळी जनतेशी साधणार संवाद !

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री ,खा.श्री.शरदचंद्रजी पवार हे सोमवार दि.13 मे, 2019 रोजी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणीही ते करणार आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.

पवार यांचे सकाळी 10.30 वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे आगमन होणार आहे, तेथे ते शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या अडचणी जाणुन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील एका गुराच्या छावणीस ते भेट देणार आहेत. दुपारी 01.15 वाजता ते नवगण राजुरी, जि.बीड येथील गुरांच्या छावणीस भेट देऊन त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 03.30 वाजता ते पिंपळवंडी, ता.पाटोदा येथील गुरांच्या छावणीस भेट देणार आहेत, तसेच काही जळालेल्या फळबागांची पहाणी ही करणार असून, त्यानंतर मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत.

या दौर्‍यात त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आ.अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे, युवक नेते संदिप क्षीरसागर, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यात यावेळी भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकर्‍यांचे अश्रु पुसण्यासाठी शेतकर्‍यांचे जाणते नेते स्वतः शेतकर्‍यांच्या बांधावर जाणार आहेत.

COMMENTS