शरद पवारांची आज 4 वाजता बेळगावमध्ये सभा, काही अटींवर परवानगी !

शरद पवारांची आज 4 वाजता बेळगावमध्ये सभा, काही अटींवर परवानगी !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बेळगावमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज बेळगाव सिपीएड मैदानवर भव्य सभा होणार आहे. आज 4 वाजता ही सभा होणार असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं पवारांच्या सभेचं आयोजन केलं आहे. परंतु या सभेसाठी काही अटी ठेवण्यात आल्या असून अटी मान्य केल्यानंतरच या सभेला प्रशासनानं परवानगी दिली आहे.

दरम्यान आज सकाळी शरद पवार बेळगावच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यानंतर शहापूरमधील तुकाराम बँकेला धावती भेट देणार असून इतर खासगी कार्यक्रम संपवून दुपारी 4 00 वाजता सिपीएड मैदानवरील भव्य सभेसाठी ते हजर राहणार आहेत. तेंव्हा समस्त मराठी सीमाभाग व महाराष्ट्रातील काही भागातील जनता  व बिदर,  मालकी सह खानापूर , निपाणी ,संकेश्वर , हजारोंच्या संख्येने सभास्थळी हजर राहणार असल्याची माहिती  महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव प्रकाश मरगाळे यांनी दिली आहे.

COMMENTS