राष्ट्रवादीतर्फे राज्यभर असा साजरा केला जाणार शरद पवारांचा वाढदिवस !

राष्ट्रवादीतर्फे राज्यभर असा साजरा केला जाणार शरद पवारांचा वाढदिवस !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यामुळे पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यभर सामाजिक कार्यक्रम घेवून पवारांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 80 लाखाचा बळीराजा कृतज्ञता कोष प्रदान केला जाणार आहे.

दरम्यान यावर्षी पक्षाच्यावतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शिवाय बळीराजा कृतज्ञता कोष तयार करुन पवार हे 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. शिवाय पक्षाकडून संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. तसेच मुंबई युवकांच्यावतीने 11 ते 20 डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात येणार आहे.

COMMENTS