आमदार हेमंत टकलेंवर शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी !

आमदार हेमंत टकलेंवर शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार हेमंत टकले यांच्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. टकले यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय स्तरावरील चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष आमदार टकले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हेमंत टकले यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान आमदार हेमंत टकले हे राष्ट्रवादीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी राजकारणासोबतच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं आहे. विधान परिषद सभागृहामध्ये वेगवेगळया विषयांवर प्रभावी मांडणी करणे आणि त्या विषयाचे गांभीर्य सरकारपर्यंत पोहचवण्याचा त्यांचा विशेष हातखंडा  असून कला-साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. याचा विचार करता पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय स्तरावरील चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

COMMENTS