शरद पवारांची नवी खेळी, विखेंचे जावई करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

शरद पवारांची नवी खेळी, विखेंचे जावई करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची आणखी एक नवी खेळी पहायला मिळत आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे जावई आणि अर्थातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात करणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते आज पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.तसेच संभाजी झेंडे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आव्हान देणार आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवतारे यांच्याविरोधात झेंडे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे

दरम्यान संभाजी झेंडे हे  निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा सर्वच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी अंत्यत जवळचे संबंध आहेत.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच झेंडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

COMMENTS