आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांना ‘या’ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ?

आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांना ‘या’ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.
स्मिता पाटील मावळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर स्मिता पाटील यांना मावळमधून निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून स्मिता पाटील पक्षाच्या आग्रहामुळे निवडणूक लढवण्याची शक्यता असून शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून नव्या उमेदवारासाठी चाचपणी सुरु आहे. यात स्मिता पाटील यांचे नाव पुढे आल्याची सूत्रांची माहिती आहे. स्मिता पाटील यांच्याशी पक्षाची प्राथमिक चर्चा झाली असुन स्मिता पाटील यांचा होकार आल्यानंतर पक्ष निर्णय घेणार आहे.

COMMENTS