सुनील तटकरेंच्या कन्येविरोधात शिवसेनेकडून ‘यांना’ उमेदवारी!

सुनील तटकरेंच्या कन्येविरोधात शिवसेनेकडून ‘यांना’ उमेदवारी!

मुंबई – राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्षाकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवव ठाकरे यांनी देखील एबी फॉर्म वाटपाचा सपाटा लावला आहे. रायगडमधील श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून खासदार सुनिल तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांचं नाव निश्चित आहे.त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुद्ध घोसाळकर अलसा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान उमेदवारी घोषित होताच घोसाळकर यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडूनही जोरदार प्रचार सुरु आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर प्रचाराची मोहीम उघडलीय. दोन्ही नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्यामुळे या निवडणुकीत हा मतदारसंघ चांगलाच गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS