महाविकास आघाडीने राखला मराठवाड्याचा गड, चव्हाणांची हॅटरिक

महाविकास आघाडीने राखला मराठवाड्याचा गड, चव्हाणांची हॅटरिक

मुंबई –   विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पहिल्चा फेरीपासून पाचव्या फेरीपर्यंत आघाडी कायम राखत विजय मिळवत हॅटट्रिक पूर्ण केली. त्यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. तर नागपूर व पुणे मतदारसंघांची मतमोजणीर सुरू असून दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

काल पासून सुरू असलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८  इतके झाले. त्यापैकी तब्बल २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. भाजपच्यावतीने शिरीश बोराळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक रमेश पोखळे यांनी बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली.  पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे सतिश चव्हाण आघाडीवर होते. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण ५७ हजार ८९५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघात अरुण लाड यांनी मुसंडी मारत भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर गेले आहेत. तर शिक्षक मतदारसंघाच काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला असून काॅंग्रेसचे अभिजित वंजारी १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे.

COMMENTS