भाजपला मतदान करणं भोवलं, राष्ट्रवादीतील सहा जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन!

भाजपला मतदान करणं भोवलं, राष्ट्रवादीतील सहा जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन!

सोलापूर – राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करणाय्रा सहा जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. माळशिरस तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते बळीराम साठे यांनी याबाबतचे पत्र आज प्रसिद्ध केले आहे. या सहा सदस्यांना अपात्र करावे अशी मागणी गटनेते बळीराम साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.या प्रकरणाची सोमवारी सुनावणी होणार असून तत्पूर्वी राष्ट्रवादीने या सहा सदस्यांना निलंबित केले आहे.

दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला मतदान झाले होते. यात पुरेसे संख्याबळ असताना देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते. सहा सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केल्याने राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीला अपयश आले. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील स्वरूपाराणी मोहिते, शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

COMMENTS