मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून यांच्या नावाची घोषणा!

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून यांच्या नावाची घोषणा!

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते याकडे मध्य प्रेदशमधील जनतेचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष  कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री उशीरा काँग्रेसने ट्विटरद्वारे कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. उद्या त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याचं बोललं जात आहे.काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार चूरस होती. मात्र पहिल्यापासूनच कमलनाथ यांचं नाव आघाडीवर होतं. पण नेतृत्वाचा प्रश्न राज्यात सुटू न शकल्याने अंतिम निर्णय हायकमांडवर सोपवण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या नावाची घोषणा केली. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिल्लीत मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती आहे. त्यानंतर ‘ना कुठली स्पर्धा आहे ना पदासाठीचा संघर्ष. आम्ही मध्य प्रदेशाच्या जनतेच्या सेवेसाठी आहोत,’ असे ट्विट करून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वखुशीने माघार स्वीकारली आहे.

COMMENTS