तुमचा उत्तराधिकारी कोण असेल?, राहुल गांधी यांचं उत्तर!

तुमचा उत्तराधिकारी कोण असेल?, राहुल गांधी यांचं उत्तर!

मुंबई – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांनी आपला उत्तराधिकारी आपण नाही तर पक्ष निवडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच
काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नेमले जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अद्याप यासंदर्भातलं नेमकं चित्र स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत. बुधवारी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांनाच अध्यक्षपदी रहा अशी विनंती केली मात्र ती त्यांनी अमान्य केली असं सूत्रांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर गांधी घराण्यातली व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नको असं राहुल गांधी यांनी सुचवलं होतं. त्यामुळे आता अशोक गेहलोत यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नेमले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

COMMENTS