जेएनयूत पुन्हा ‘लाल सलाम’ !

जेएनयूत पुन्हा ‘लाल सलाम’ !

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या विचारांची सत्ता आली आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला असून चारही जागांवर जेएनयूने विजय मिळवला आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहचिटणीस या पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत आयिशी घोष हिची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी उशिरा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीविरोधात जेएनयू विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यापीठाला निकाल राखून ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर, सहा सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने निकाल घोषीत करण्याची परवानगी दिली. त्यानंतर निकालांची घोषणा करण्यात आली. निकाल जाहीर होताच ‘लाल सलाम’च्या घोषणा देत डाव्या संयुक्त आघाडीने विद्यापीठ परिसर दणाणून सोडला होता.

COMMENTS