“पंतप्रधान मोदींच्या जीवाला कधी नव्हे इतका धोका, २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षेची गरज !”

“पंतप्रधान मोदींच्या जीवाला कधी नव्हे इतका धोका, २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षेची गरज !”

नवी दिल्ली  – पंतप्रधान मोदींच्या जीवाला कधी नव्हे इतका आता धोका निर्माण झाला असून २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना सुरक्षेची सर्वाधिक गरज असल्याची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपद्वारे परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही मंत्र्याला, तसेच अधिकाऱ्यालाही पंतप्रधान मोदींच्या जवळ येता येणार नसल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान मोदींना २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी रोड शो कमी करून सभांवर अधिक भर देण्याचा सल्ला गृह मंत्रालयाने दिला आहे. रोड शोमध्ये सुरक्षेची व्यवस्था करणे कठीण असते, तर तुलनेने सभांसाठीचे नियोजन करणे सोपे असल्याचं एसपीजीचं म्हणणे आहे.  तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतच्या क्लोज प्रोटेक्शन टीमला (सीपीटी) या नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली असून सीपीटीला संभाव्या धोक्याबाबत सावध करण्यात आलं असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS