नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन निवडणूक,  गणेश नाईकांचा युतीच्या नेत्यांना दणका !

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन निवडणूक, गणेश नाईकांचा युतीच्या नेत्यांना दणका !

नवी मुंबई – भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांनी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत युतीच्या स्थानिक नेत्यांना दणका दिला आहे. या निवडणुकीत नाईक गटाने युतीचा धुव्वा उडवला असून नाईक यांनी युतीच्या नमो पॅनलचा पराभव केला आहे. नाईक यांच्या डॉ. राणे पॅनलचा 11 विरुद्ध 1 अशा फरकाने विजय झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या गणेश नाईक यांनी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाईक हे नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. संदीप नाईक यांच्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत चमकदार कामगिरी केल्यानंतर ते लवकरच भाजपात जातील असं बोललं जात आहे.

COMMENTS