गणेश नाईक यांना अखेर भाजपकडून उमेदवारी जाहीर!

गणेश नाईक यांना अखेर भाजपकडून उमेदवारी जाहीर!

नवी मुंबई – राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांना अखेर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार संदीप नाईक यांनी माघार घेतली असून त्यांच्या ठिकाणी गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा प्रभारी सतीश धोंड यांच्या हस्ते नाईक एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे गणेश नाईक गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान भाजपने काल विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये गणेश नाईक यांच्या जागी बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली होती.
त्यामुळे ते नाराज होते. या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांनी आज महापालिका नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संदीप आणि संजीव नाईक उपस्थित होते. त्यानंतर भाजपनं ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

COMMENTS