भाजप प्रवेश करण्यापूर्वी गणेश नाईकांसमोर नमो पॅनलचे आव्हान !

भाजप प्रवेश करण्यापूर्वी गणेश नाईकांसमोर नमो पॅनलचे आव्हान !

मुंबई – नवी मुंबईतील माजी आमदार संदीप नाईक यांच्या पाठोपाठ माजी मंत्री गणेश नाईक हे देखील लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच गणेश नाईकांसमोर स्थानिक भाजप अणि शिवसेनेने राज्यातील सर्वात मोठ्या नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबच्या निवडणुकीत आव्हान उभं केलं आहे. ही निवडणूक उद्या पार पडणार असून नाईकांच्या डॉ राणे पॅनल समोर युतीच्या स्थानिक नेत्याने नमो पॅनल उभं केलं आहे. त्यामुळे विधानसभांच्या निवडणकीआधी क्लबची निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे गणेश नाईक हे आव्हान कसं पेलणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा अखेर खरी ठरली असून माजी मंत्री गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच नाईक यांच्यापुढे नमो पॅनलचं आव्हान उभ ठाकलं आहे. त्यामुळे नाईक हे आव्हान कसं पेलतील याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS