गणेश नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली, 13 नगरसेवकांनी घेतली ‘ही’ भूमिका !

गणेश नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली, 13 नगरसेवकांनी घेतली ‘ही’ भूमिका !

मुंबई – गणेश नाईक यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने नेरूळमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत काही निष्ठावान नगरसेवकांनी आम्ही पक्ष सोडणार नसल्याचं पवारांना कळवलंय.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे नवी मुंबई महानगरपालिकतले 13 नगरसेवक देखील उपस्थित होते. या 13 नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावल्याने नाईक समर्थकांमधील फूट उघड होताना दिसून येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आमदार संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यानंतर गणेश नाईक यांच्यासोबत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु या 52 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवकांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या गणेश नाईक यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS