महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी यांची नियुक्ती !

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी यांची नियुक्ती !

मुंबई – महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या जागी आता राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाकणकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण उपस्थित होत्या.रुपाली चाकणकर यांचं शहराध्यक्षपद नुकतंच काढून घेण्यात आलं होतं, मात्र आता राष्ट्रवादीने त्यांना थेट राज्याचं महिला संघटन सांभाळण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी दिली आहे.

दरम्यान राज्यात चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं महिला संघटन करण्याचं चांगलं काम केलं होतं. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महिलांच्या विविध मुद्द्यांवरुन सरकारला चांगलच घेरलं होतं. परंतु गेली काही दिवसांपासून त्या पक्षावर नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS