दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा होता कट !

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा होता कट !

नवी दिल्ली  दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ने उधळला आहे. देशभर साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणे आणि आत्मघाती हल्ल्याच्या मदतीने राजकीय नेत्यांच्या हत्या करण्याचा कट या अतिरेक्यांनी आखला होता अशी माहिती एनआयएने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्त्वाचे राजकीय नेते या अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा कट उधळल्यानंतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे.

दरम्यान NIA ने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली असून या अतिरेक्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आणि देशी रॉकेट लॉन्चर्स जप्त करण्यात आले आहेत. ISI या दहशतवादी संघटनेसारखं मोड्युल या अतिरेक्यांनी विकसित केलं होतं. तसेच या अतिरेक्यांकडून साडेसात लाख रुपये रोख, 100 मोबाईल्स 150 सीमकार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

 

COMMENTS