संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करतील, निलेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका!

संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करतील, निलेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका!

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे पेंग्विनचा राहुल गांधी करतील, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करुन ही टीका केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे.

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. पण राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर निलेश राणे यांनी ही टीका केली असून “संजय राऊत यांच्यासारखी लोकं ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

COMMENTS