उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागतील,  नीलेश राणेंची बोचरी टीका !

उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागतील, नीलेश राणेंची बोचरी टीका !

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागणार, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. यानरुन निलेश राणे यांनी टीका केली आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ६५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवन विकसित केले जाणार आहे. महापालिकेच्या वतीने या स्मारकासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत.  मात्र, या कामासाठी ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर निविदेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

COMMENTS