फलटणचे निंबाळकर भाजपच्या वाटेवर, माढ्यातून भाजपचे उमेदवार होण्याची शक्यता !

फलटणचे निंबाळकर भाजपच्या वाटेवर, माढ्यातून भाजपचे उमेदवार होण्याची शक्यता !

माढा – भाजपला पुन्हा एकदा आयात उमेदवाराचा आसरा घ्यावा लागत आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्यामुळे आपण काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

माढ्यातून भाजपला तगडा उमेदवार मिळत नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांना जिल्ह्यातून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुख यांना लोकसभा लढवायची नाही. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी देण्याचा प्रय़त्न भाजपकडून केला जात आहे. निंबाळकर हे फलटणमधील असल्यामुळे त्यांना फलटण आणि माण खटाव मतदारसंघातून चांगले मतदान होईल. आणि सोलापूर जिल्ह्यातील चार मतारसंघात भाजप आणि मोहिते पाटील यांच्यामुळे चांगले मतदान होईल असं भाजपाचं गणित असल्याची चर्चा आहे.

COMMENTS