नितेश राणेंना भाजपकडून एबी फॉर्म, माताेश्रीवर शिवसेना नेत्यांची खलबतं !

नितेश राणेंना भाजपकडून एबी फॉर्म, माताेश्रीवर शिवसेना नेत्यांची खलबतं !

मुंबई – खासदार नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपमधून लढवणार आहेत. निवडणुकीसाठी राणे यांना भाजप एबी फॉर्म देत असल्याच्या पार्श्वभूमीवर माताेश्रीवर शिवसेना नेत्यांची खलबतं सुरु झाली आहेत. काेकणातील नेत्यांनी माताेश्रीवर तातडीची बैठक बोलावली असून बैठकीला खासदार विनायक राऊत, दिपक केसरकर, अरूण दुधवडकर उपस्थित आहेत.

दरम्यान 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितेश राणे एबी फॉर्म भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादी दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मंगळावारी रात्री नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा निर्णय झाला असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, ‘फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता’ असं सूचक ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

त्यामुळे भाजपनं उमेदवारी दिली तर शिवसेनेला युतीधर्म पाळून नितेश राणेंना कणकवलीत मदत करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेना राणे विराेध गुंडाळणार का असा सवाल उपस्थित केला जाणार आहे. तसेच कणकवली येथून शिवसेना नितेश राणेंच्या विराेधात उमेदवार देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS