आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय !

आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय !

सिंधुदुर्ग – हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करत मारहाण करणं आमदार नितेश राणे यांना चांगलच महागात पडलं असल्याचं दिसत आहे. कारण याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली दिवाणी न्यायालयात आज सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी (4 जुलै) रोजी मुंबई गोवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. या प्रकरणी त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज कणकवली दिवाणी न्यायालयात राणेंच्या जामीनावर पुन्हा सुनावणी झाली, त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी देण्यात आली आहे.  त्यामुळे य आमदार नितेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी रहावं लागणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे.

COMMENTS