कमला मिल आग प्रकरण, नितेश राणेंचे धक्कादायक खुलासे !

कमला मिल आग प्रकरण, नितेश राणेंचे धक्कादायक खुलासे !

मुंबई – कमला मिल कम्पाऊंड आग दुर्घटना प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी विशाल कारिया नावाच्या एका व्यक्तीला कमला मिल कम्पाऊंड आग दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. कारिया हा संशयांस्पद असून तो मोठा क्रिकेट बुकी असल्याची माहिती राणे यांनी दिली आहे. तसेच कारियाच्या घराबाहेर पोलिसांना फरार पब्स मालकांच्या गाड्या सापडल्याचा दावा राणे यांनी केला आहे.

 

मुंबई पोलिसांनी नुकतीच जोजो आणि डिके या मोठ्या क्रिकेट बुकींवर केली होती. त्यांच्या मोबाईल सीडीआरमध्ये असलेला कारियाच्या संपर्कचा पुरावा राणे यांनी सादर केला आहे. तसेच कारियाची पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ओळख असून तो याप्रकरणातून सुटेल अशी भीतीही राणे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आगीच्या दुर्घटनेची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीवर आपण ठाम असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS