1 तारखेला जल्लोष करायचा की तोडफोड हे ठरवू – नितेश राणे

1 तारखेला जल्लोष करायचा की तोडफोड हे ठरवू – नितेश राणे

मुंबई – उद्धव ठाकरेंना अयोध्येत राम मंदिर बांधायचं आहे मात्र नाणार प्रकल्पामुळे 103 मंदिर उधवस्त होणार आहेत. तसेच अयोध्येत राम मंदिर उभारण्यापूर्वी ज्या कोकणाने शिवसेनेला आमदार खासदार दिले त्या कोकणाला आधी वाचवा असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी तेलं आहे. नाणार प्रकल्प हा खासदार विनायक राऊत यांचं पाप आहे. त्यांनी ही जागा सुचवली
शिवसेना हा सेटलमेंट वाला पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचा नाणारला विरोध मावळला असल्याचंही राणे.यांनी म्हटलं आहे.

जरम्यान उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाऊन नाणार जाणार असा डायलॉग मारला तो फक्त चित्रपटातीलच डायलॉग ठरला आहे.कोकणातल्या देवी देवतांना वाचावा नाहीतर असं पाप लागेल की 2019 ला दुसरी मातोश्री बांधू शकणार नाहीत असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.तसेच कुठल्याही परिस्थितीत नाणारचा प्रकल्प कोकणात नको 95% लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तशा पद्धतीचे ठराव झाले असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आला तरच सगळ्यांना विरोध का सुचतो,अन्य समाजाच्या आरक्षणाच्या वेळी हे प्रश्न उपस्थित होत नाहीत असा सवालही यावेळी राणे यांनी व्यक्त केला आहे.सरकारने जर मराठा आरक्षणाबद्दल चालढकल केली तर लोक सरकारला ढकलतील.आधीवेशनातले तीन दिवस महत्वाचे आहेत मग एक तारखेला जल्लोष करायचा की तोडफोड हे ठरवू असा इशाराही यावेळी राणे यांनी लगावला आहे.नितेश राणे यांनी आझाद मैदान इथे सुरू असलेल्या नाणार प्रकल्प विरोधी धरणे आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

COMMENTS