…तर मुंबईकरांनी महापालिकेवर किती दंड आकारला पाहिजे ? – नितेश राणे

…तर मुंबईकरांनी महापालिकेवर किती दंड आकारला पाहिजे ? – नितेश राणे

मुंबई – आजपासून मुंबई शहर तसेच राज्यभर प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी ही चांगली बाब असली, तरी मुंबई महानगरपालिकेला प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिकांवर ५ हजार रुपये दंड आकारण्याचा अधिकार आहे का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या कामावरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान आजपर्यंत मुंबईतीली रस्त्यावर पडलेले खड्डे, नालेसफाई, कचरा, पाण्याचा प्रश्न या सर्व बाबींमध्ये मुंबई महापालिका अपयशी ठरली असल्याचं दिसत असून  त्यासाठी कुठलाही नागरिक त्यांच्याकडून दंड आकारत नाही. वर्षानुवर्ष जेवढा असेल तेवढा कर मुंबईकर भरत आला आहे. परंतु आता जर प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर पालिका एवढा दंड आकारत असेल तर, मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी त्यांनी पालिकेवर किती दंड लावला पाहिजे? असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराने सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.

COMMENTS