आता निघणार बीएमसीला टाळं ठोका मोर्चा !

आता निघणार बीएमसीला टाळं ठोका मोर्चा !

मुंबई – कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीच्या झळा देशभर पोहचल्या असल्याचं शुक्रवारी पहायला मिळालं आहे. या आगीवरुन राजकीय वातावरणही जोरदार तापलं आहे. शिवसेना आणि मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. याविरोधात आता काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईला टाळे ठोका असा मोर्चा काढणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे, दरम्यान मुंबईमध्ये वारंवार घडत असलेल्या दुर्घटनांमुळे सामान्य नागरिकांचा जीव जात आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. पावसाळ्यात मुंबई तुंबते त्यावेळी मुंबईकरांचे बेहाल होता. तसेच शहरातील इमारती कोसळण्याच्या दुर्घटनाही काही कमी नाही. मुंबई प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी इमारतीला आग लागण्याच्याही घटना घडतात.

कमला मिल मधील ताजी घटना असताना महापालिका प्रशासनानं दक्षता बाळगणं गरजेचं आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे हा महापालिकेचा ढिसाळ कारभार असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.तसेच अनधिकृतपणे चालणारे हुक्का पार्लर देखील बंद करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईला टाळे ठोका असा मोर्चा काढणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कमला मिल कम्पाऊंडमधील आगीवरुन आता राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS