भाजपकडून राणे पिता-पुत्रांना गिफ्ट

भाजपकडून राणे पिता-पुत्रांना गिफ्ट

सिंधुदुर्ग – ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राण यांनी अनेक गावांमध्ये भाजपला सत्ता मिळवून दिल्याने त्यांना भाजप आणि केंद्र सरकारकडून भेट देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांना प्रदेश कार्यकारिणीच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नारायण राणेंना केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात नारायण राणेंची सत्ता होती. मात्र, मागील काही वर्षांपासून शिवसेनेने त्यांच्यावर मात करण्यास सुरुवात केली. यात स्वतः नारायण राणेंचा विधानसभेला दोन वेळा पराभव झाला. तसेच त्यांचे थोरले चिरंजीव नितेश राणे यांचा लोकसभेला पराभव झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राणे मागे पडले होते. दरम्यान, कोकणात भाजपला पक्ष बांधणी करण्यासाठी त्यांनी राणेंना गळ घातला. तसेच शिवसेनाला कात्रीत पकडण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यांना केंद्रात मंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना राज्यसभेवर घेतले मात्र, केंद्रात मंत्री पद दिले गेले नाही. परंतु राणे पिता-पुत्र भाजपच्या वतीने शिवसेनेवर हल्ला करीत आहेत. शिवसेनेवर आरोप करून त्यांना नामोहरम करण्याची ते संधी सोडत नव्हते.

राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आणल्या. बहुतेक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवल्याने त्याचे बक्षीस म्हणून भाजपने माजी खासदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गात शिवसेनेवर मात केल्यानंतर लगेच निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रदेश सचिवपदही देण्यात आले आहे.
तसेच भाजप नेते नारायण राणे यांना केंद्राने Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. करे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राणेंना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ठा

COMMENTS