‘तो’ महाराष्ट्रातील काळा दिवस होता –नितीन गडकरी

‘तो’ महाराष्ट्रातील काळा दिवस होता –नितीन गडकरी

नांदेड समाजातील काही लोक जातीय तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तसेच नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत. जो ज्या जातीचा असतो तो कधीच त्या जातीचा विकास करत नाही, तसंच जो ज्या भागाचा नेता असतो तो तिथला विकास करत नाही हे सत्य आहे, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आल्यामुळे तो महाराष्ट्रातील काळा दिवस असल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी जलयुक्त शिवारच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच मराठवाड्याला केंद्रीय जलसंधारण विभागाकडून एक लाख कोटीचा निधी देण्याची घोषणाही केली. मात्र लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली तो महाराष्ट्रातील काळा दिवस असल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे. नांदेडमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

COMMENTS