सरकारी विभागात चांगले काम करणा-यांचं कौतुक होत नाही आणि चुका करणा-यांना कधी शिक्षा होत नाही – गडकरी

सरकारी विभागात चांगले काम करणा-यांचं कौतुक होत नाही आणि चुका करणा-यांना कधी शिक्षा होत नाही – गडकरी

नागपूर – सरकारी विभागात चांगले काम करणा-यांचं कधी कौतुक होत नाही आणि चुका करणा-यांना कधी शिक्षा होत नसल्याचं वक्त्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमता ते बोलत होते.  सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर जो वेगाने  करेल तोच देश प्रगती करेल असंही यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच अनेकदा मंत्री म्हणून अनेक प्रकल्पांचे क्रेडिट मिळतं पण खरं श्रेय हे अधिकारी आणि कर्मचा-यांचं असल्याचंही यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रस्ते अपघात अनेकदा चुकीच्या डीपीआर आणि चुकीच्या इंजिनिअरींगमुळे होत असतात. टेलिफोन विभागाचे लोक रस्ते खोदण्यासाठी नवे रस्ते शोधतच असतात असा मला प्रश्न पडतो असंही यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच काही अधिकारी बायकोपेक्षा फाईल्सवर जास्त प्रेम करताहेत. अनेक वर्ष तशीच फाईल पेडींग ठेवतात असा टोला त्यांनी पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिका-यांना लगावला आहे.

तसेच नागपुरात झीरो माईल आहे. आशियातील शहारामधील अंतरे मोजताना, भारतातील अंतर ब्रिटिशांनी नागपूरपासूनच मोजली. नागपूरात जे होतं ते देशभर जातं अस वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी आणि मुख्यमंत्री बोलत होते.

COMMENTS