…असं वाटत असतानाच बाजी पलटते, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य !

…असं वाटत असतानाच बाजी पलटते, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य !

नवी दिल्ली – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हातातली मॅच जात आहे, असं वाटत असतानाच बाजी पलटते असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच आता कोणाचं सरकार येणार, मला माहिती नाही. कोणतंही सरकार आलं, भाजपचं, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, ते विकासासाठी होणाऱ्या सकारात्मक आणि धोरणात्मक उपक्रमांना पाठिंबा देतील असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.

दरम्यान राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु आहे. अशातच नितीन गडकरी यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. कधीतरी तुम्हाला वाटतं सामना तुमच्या हातून निसटत चालला आहे. पण अंतिम निकाल अगदी उलट लागतो. मी दिल्लीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा फारसा संबंध येत नाही. असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS