त्यामुळे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचा बंगला 24 तासात बदलला!

त्यामुळे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचा बंगला 24 तासात बदलला!

मुंबई – कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना दे‌ण्यात आलेला बंगला 24 तासात बदलण्यात आला आहे.
नितीन राऊत यांना आधी ‘चित्रकूट’ बंगला देण्यात आला होता. मात्र 24 तासांत पुन्हा नवीन जीआर काढत  राऊत यांना ‘चित्रकूट’ऐवजी ‘पर्णकुटी’ या शासकीय बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. राऊत यांना आधी दिलेला ‘चित्रकूट’ बंगला हा आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आता देण्यात आला आहे.चित्रकूट बंगल्यावरून नितीन राऊत नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे 24 तासात पुन्हा नवीन ऑर्डर काढत नवीन बंगला दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात अजूनही शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ बंगला मिळाला आहे. छगन भुजबळ यांना ‘रामटेक’, जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ आणि एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ हे बंगले देण्यात आले आहेत.
परंतु आता काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोणता बंगला दिला जाणार हे पाहण गरजेचं आहेे.

COMMENTS