राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश, “त्यामुळे मी राष्ट्रवादी सोडली !”

राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश, “त्यामुळे मी राष्ट्रवादी सोडली !”

मुंबई – राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुर्लक्ष होऊ लागल्यानं हा अस्तित्वाचा प्रश्न होता त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मी स्वगृही परत आले असून आज प्रवेशाचा कार्यक्रम देखणा, सुंदर प्रयत्न आहे. माझ्या मनापासून शुभेच्छा असून शिवसेनेला भरभराटी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं माने यांनी म्हटलं आहे.आता राजू शेट्टी बॅकफूट वर गेले आहेत. राजू शेट्टीना त्यांची जागा दाखवणार आहे. फक्त दोन मिनिटांत उद्धव साहेबांनी धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली असंही यावेळी निवेदिता माने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मायेचा ओलावा फक्त शिवसेनेत मिळतो.आता वातावरण निर्माण होत असून पश्चिम महाराष्ट्र ही तर शिवरायांची भूमी आहे. त्यामुळे तिथे भगवा फडकणारच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

छत्तीसगडमध्ये आदीवासी राज्यातील लोकांनी सर्वांनाल चकित केलंय आहे. त्यांना जे हवय तेच त्यांनी केलंय. निवडणुक निकाल तेच सांगतोय. कोणाला कोणती जागा हे सर्वांनाच माहीत आहे.सगळ्याच जागा आपल्या आहेत. त्यामुळे तयारीला लागा असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

COMMENTS