शिवसेनेचा मोठा राजकीय निर्णय  !

शिवसेनेचा मोठा राजकीय निर्णय !

नवी दिल्ली – तेलगू देशम पक्षाने आणलेल्या सरकाविरोधातील अविश्वास ठरावावर आज मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावर शिसवसेना मोदी सरकारच्या बाजून राहणार नाही. तसंच ते विरोधकांसोबतही असणार नाहीत. त्यामुळे शिवसेना आज विश्वास दर्शक ठरावाच्यावेळी तटस्थ राहणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

सरकारच्या बाजुने जुळवाजुळव करताना काल अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती होती. तसंच शिवसेना सरकारच्या बाजुने उभी राहिल अशाही बातम्या माध्यमांमधून झळकल्या होत्या. चंद्रकांत खैरे यांच्या लेटरहेडवरुन भाजपला समर्थन देण्याचं पत्रही काही माध्यमांपर्यंत पोहचलं होतं. मात्र तरीही आनंदराव आडसूळ, अरविंद सावंत आणि संजय राऊत या तीन खासदारांनी पाठिंब्या निर्णय अजून झाला नसल्याचं सांगत सस्पेन्स कायम ठेवला होत. आज सकाळी 11 च्या सुमारास शिवेसनेची दिल्लीत खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतो ते पहावं लागेल. पाठिंबा नसलेल्या सरकारमध्ये शिवेना राहते का ते पहावं लागेल.

COMMENTS