मुंबईतील प्रिया दत्त यांच्या लोकसभा मतदारसंघावर ‘या’ नेत्यांच्या नजरा, राहुल गांधी कोणाला देणार संधी ?

मुंबईतील प्रिया दत्त यांच्या लोकसभा मतदारसंघावर ‘या’ नेत्यांच्या नजरा, राहुल गांधी कोणाला देणार संधी ?

मुंबई  – काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला मिळणार याबाबत काँग्रेस पक्षात अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. या जागेसाठी काँग्रेसमधील काही दिग्गज नेते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि तेलंगणचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन देखील या जागेवर इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याचबरोबर माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग आणि माजी मंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार नसीम खान यांच्यात या जागेसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या जागेसाठी सर्व इच्छूक उमेदवारांना हायकमांडकडे आपली बाजू मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या जागेवर आता जोरदार चुरस निर्माण झाली आहे.तरी या जागेबाबत अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  घेणार आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS