राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांना निवडणूक आयोगाची नोटीस !

राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांना निवडणूक आयोगाची नोटीस !

पिंपरी – चिंचवड – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पेड न्यूज प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या बातम्यांचा खर्च जाहिरात खर्चात का समाविष्ट करु नये, असा सवाल त्यांना यामध्ये विचारण्यात आला आहे. “पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा” ही बातमी व “पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरुवात” या दोन बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये सारख्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे पार्थ यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान पहिल्या भाषणातील चुका, सभा आणि ट्रॅफिक नसताना पळत सुटणे, उलट्या रेल्वेने प्रवास करणे आणि वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरुला भेटल्याने पार्थ पवार हे याआधी ट्रोल झाले आहेत. त्यानंतर आता पार्थ पवार यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS