‘हा’ तर जुनाच निर्णय आहे – विनोद तावडे

‘हा’ तर जुनाच निर्णय आहे – विनोद तावडे

मुंबई – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. तो निर्णय 2006 मध्ये घेण्यात आला असून जूना आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील विद्यापीठाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती अथवा पदकांसाठी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता त्याची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक विद्यापीठाला देण्यात आल्याचे तावडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
कोणत्याही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक देताना घटनेतील मूलभूत अधिकाराला बाधा न येता विद्यार्थ्याची निवड करावी. देणगीदारांकडून पुरस्कृत करण्यात येणारी कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक यासाठीच्या निकषासाठी विषमता निर्माण करणारी कोणतीही अट कोणत्याही विद्यापीठाने स्वीकारू नये, असेही सर्व विद्यापीठांना कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  देणगीदार पुरस्कृत पदक व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना घटनेने जे मुलभूत अधिकार दिले आहेत, त्यामध्ये भेदभाव न करता मुलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

COMMENTS