शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा !

शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा !

शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर शेतक-याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येतीळ शेतक-याने लोकसभा निवडणुकीपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी शेतक-याने चिठ्ठी लिहीली होती. त्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नावे लिहिली होती. यावरुन लोकसभा निवडणकीच्या प्रचारात विरोधकांनी ओमराजे यांच्यावर शरसंधान साधलं होतं. आता निकालानंतर तब्बल 4 महिन्यांनी ओमराजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रुंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राणा पाटील हे उस्मानाबाद किंवा तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र आपण राणा पाटील यांना कदापी मदत करणार नाही. ते कुठूनही निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांच्या विरोधात प्रचार करु अशी आक्रमक भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली आहे. त्यामुळेच या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची टाईमिंग साधल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS