भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा महाआघाडीत सहभाग !

भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा महाआघाडीत सहभाग !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएला मोठा धक्का बसला आहे. रालोसपाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी महाआघाडीत सहभाग घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपूर्वीच एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आज त्यांनी महाआघाडीत सहभाग घेतला आहे.

दरम्यान आमची महाआघाडी ही विचारधारांमुळे जोडलेली महाआघाडी असून इथे जागावाटपांवरून भांडणे होणार नाहीत. तसेच योग्य वेळ आल्यावर जागावाटप प्रेमाने करणार असल्याचं कुशवाह यांनी यावेळी म्हटलं आहे.

यावेळी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. आमची लढाई ही देश आणि देशाची घटना वाचवण्याची लढाई आहे. सीबीआय, ईडी, आरबीआय हे सगळे एका पक्षाच्या हाती चालले आहे. देशाला धोका देणाऱ्यांच्याविरोधातली ही लढाई आहे असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

COMMENTS